|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » मुंबई युवा संघात अर्जुनची निवड

मुंबई युवा संघात अर्जुनची निवड 

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबईच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. 16 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया सहाव्या अ.भा. यू-19 जेवाय लेले निमंत्रितांच्या वनडे स्पर्धेसाठी हा संघ निवडण्यात आला असून बडोदामध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

या स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व सुवेद पारकर करणार असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव उन्मेष खानविलकर यांनी सांगितले. गेल्या जुलैमध्ये अर्जुनची भारतीय यू-19 संघात लंका दौऱयातील युवा कसोटीसाठी निवड करण्यात आली होती. वरि÷ राष्ट्रीय संघाच्या सरावावेळीही तो गोलंदाजी करीत असतो. मुंबई संघ : सुवेद पारकर (कर्णधार), दिक्यांश सक्सेना, करण शाह, प्रज्नेश कनपिल्लेवर, हशिर दफेदार, अर्सलान शेख, यश साळुंखे, केसर सिंग थापा, वैभव कलमकर, अथर्व अंकोलेकर, भूषण जलवाडकर, प्रफुल देवकाते, अर्जुन तेंडुलकर, उझेर खान, बलवंत सिंग सोधा, सक्षम पराशर.