|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » लॉरिसवर 20 महिन्यांची ‘ड्रायव्हिंग’ बंदी

लॉरिसवर 20 महिन्यांची ‘ड्रायव्हिंग’ बंदी 

मद्यपान करून ड्रायव्हिंग केल्याने विश्वचषक विजेत्या कर्णधारावर कारवाई

वृत्तसंस्था/ लंडन

फ्रान्सचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार हय़ुगो लॉरिस याच्यावर 20 महिन्यांची ड्रायव्हिंग बंदी घालण्यात आली. याशिवाय त्याला दंडही करण्यात आला आहे. मद्यपान करून ड्रायव्हिंग केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे ब्रिटिश माध्यमांनी बुधवारी सांगितले.

31 वषीय टॉटनहॅम हॉटस्परचा गोलरक्षक असलेल्या लॉरिसने मद्यपानाची मर्यादा ओलांडल्याचे मान्य केले. 35 मायक्रोग्रॅम मद्यपान करून ड्रायव्हिंग करण्याची मर्यादा आहे. गेल्या महिन्यात मध्य लंडनमध्ये पोलिसांनी त्याला अडविले तेव्हा या मर्यादेहून अधिक मद्यप्राशन केले असल्याचे त्याने सुनावणीत मान्य केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई झाली. गेल्या जुलैमध्ये फ्रान्सने विश्वचषक जिंकला, त्या संघाचा लॉरिस कर्णधार होता. 20 महिन्यांच्या ड्रायव्हिंग बंदीबरोबर वेस्टमिन्स्टर न्यायालयाने त्याला 50,000 पौंड्स (65130 डॉलर्स) दंडही ठोठावला आहे.

वकील हेन्री फिच म्हणाले की, 30 एमपीएच वेगाच्या झोनमध्ये लॉरिस 15 एमपीएच वेगाने कार चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याने आपली कार अन्य पार्क केलेल्या ठिकाणी नेली आणि नंतर रेड लाईट लावून पुढे नेली. लॉरिसचे वकील म्हणाले की, ‘15 जुलै रोजी जगातील सर्वश्रे÷ व्यक्ती ठरलेल्या लॉरिसला 40 दिवसांनंतर अटक झाली आणि बेडय़ा घालून एक रात्र पोलिस स्टेशनात घालवावी लागल्याने त्याला मानभंगाचा अनुभव घ्यावा लागला.’ या घटनेबद्दल लॉरिसने त्याच्या पाठिराख्यांची माफी मागितली आहे.