|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आम्ही संविधान मानणारे आहोत

आम्ही संविधान मानणारे आहोत 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

आम्ही भारतीय संविधान मानणारे आहोत असे अभिवचन घेण्याचा कार्यक्रम 28 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरात आयोजित करण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दल आणि निर्मिती दलाच्या वतीने आयोजित बैठकीत घेण्यात आला. साहित्यिकांसह राज्यातून एक लाख लोक या अभिवचन कार्यक्रमाला राहतील यासाठी नियोजन करण्याची चर्चा या बैठकीत झाली.

धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचा बीमोड करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल आणि निर्मिती विचारमंचच्या वतीने मंगळवारी शाहू स्मारक येथे  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. देशातील दलित,स्त्रिया, मुस्लिम, आदिवासी आणि उपेक्षितांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. हे अत्याचार मनात दहशत निर्माण करणारी आहे. याला सरकारच्या स्तरावरसुध्दा पाठबळ मिळताना दिसत आहे. यामुळे आज आपण गप्प बसलो तर परिस्थिती भयावह बनणार आहे. या सर्व घटनांविरोधात बहुजनांची मोट बांधून जातीयवादी शक्तींच्या बीमोडासाठी चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे नेते  डॉ. भारत पाटणकर होते. ते म्हणाले, देशात जाती धर्माच्या नावावर उन्माद वाढला असून याला पायबंद घालण्याची गरज आहे. यासाठी चळवळ उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.शाहीर संभाजी भगत म्हणाले,  याबाबत शाहीरी जलसाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रचार करु. विठृल शिंदे म्हणाले, या कार्यक्रमात परिवर्तनवादी साहित्यिकांनी उतरावे यासाठी पुढाकार घेऊ. याबाबतचा पहिला कार्यक्रम म्हणून 28 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरात एक लाख लोकांना एकत्र आणण्याचा निर्णय झाला. यावेळी एक लाख लोक आम्ही भारतीय संविधान मानणारे आहोत असे अभिवचन घेणार आहेत. यावेळी प्रा. करुणा मिणचेकर, प्रा.विठृल शिंदे, टी.एल. पाटील,कबीर नाईकनवरे, मारुती पाटील, अनिल म्हमाने, प्रविण राघवन, गेल ऑम्वेट यांनी आपले विचार व्यक्त केले.

Related posts: