|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण, कर्मचारी संघटनेतर्फे शिष्यवृत्तीचे वितरण

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण, कर्मचारी संघटनेतर्फे शिष्यवृत्तीचे वितरण 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महानगरपालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण व कर्मचारी संघटनेतर्फे महापालिका शाळेतील पाचवीमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. मनपा प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्याना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करीम मुजावर होते. यावेळी प्रशासनाधिकारी शंकर यादव, प्रभाकर आरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  याप्रसंगी जरगनगर, टेंबलाईवाडी, अहिल्यादेवी गर्ल्स स्कूल, फुलेवाडी, नेहरूनगर, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ आदी शाळातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱया शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी सन्मानपत्र व भारतीय संविधान देऊन गौरविण्यात आले. यावेळी दिलीप भोईटे, वसंत चव्हाण, विलास पेगळे, उत्तम गुरव, आनंदराव पाटील, बजरंग लाड, विजया चव्हाण आदी उपस्थित होते.    

 

Related posts: