|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विभागीय योगासन स्पर्धेत सरस्वती हायस्कूलच्या खेळाडूंची निवड

विभागीय योगासन स्पर्धेत सरस्वती हायस्कूलच्या खेळाडूंची निवड 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा योगभवन कागवाडे मळा इचलकरंजी यांथे संपन्न झाले. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटात यश रमेश पाणीभाते – व्दितीय तर शुभम दत्तात्रय चिखलकर – तृतीय क्रमांक मिळवला. रिध्दमिक योग प्रकार मुले कौशिक समित चकोते प्रथम 17 वर्षाखालील गटात केदार किरण दिवटे – व्दितीय व सिध्दमिक योग प्रकार मुली अनुक्रमे सिध्द अशोक हुबले – व्दितीय सानिका शैलेंद्र जाधव – आटीस्टिक प्रथम सन्मती सगरे – चतुर्थ या सर्व यशस्वी खेळाडूंची निवड सातारा येथे होणार्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.

संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने, सेक्रेटरी शिवाजी जगताप, पृथ्वीराज माने यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक पी.डी.शिंदे, क्रीडाशिक्षक एस.जे.साळुंखे, एस.सी.हिरेमठ, एस.डी.परीट, निलेश कागीनकर यांचे मार्गदर्शन लाभले.