|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऋतुजा व्हरकट द्वितीय

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऋतुजा व्हरकट द्वितीय 

वार्ताहर/ शिरगांव

भारतीय जनता पक्ष व जय हो प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी येथे झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील ऋतुजा आनंदराव व्हरकट हिने द्वितीय क्रमांक मिळविला. ‘छत्रपती संभाजी महाराज एक धगधगता अंगार’ या विषयावरती तिने आपले विचार व्यक्त केले होते.

कु. ऋतुजा ही रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयांत बारावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत असुन आजतागायत तिने अनेक तालुका व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, रत्नागिरी कारागृहाचे तुरुंग अधिकारी अमेय पोतदार, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश मवेकर, उप शहराध्यक्ष राजन फाळके, महिला आघाडी अध्यक्षा सुजाता साळवी, जय हो प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाटलेकर, स्पर्धा प्रमुख प्रशांत बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याकामी तिला पाचाय सुकटणकर, आनंदराव व्हरकट, जयश्री व्हरकट यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Related posts: