|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जबाजारीपणाला कंटाळून लातुरात शेतकऱयाची आत्महत्त्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून लातुरात शेतकऱयाची आत्महत्त्या 

प्रतिनिधी/ तूर

निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील शेतकरी अशोक झटिंगा गायकवाड (वय 55 ) या अल्पभूधारक शेतकऱयाने खासगी सावकाराच्या कर्जाला व सरकारी कर्जाला कंटाळून शेतातील सोयाबिन या पिकावर फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अशोक झटिंगा गायकवाड यांनी 5 सप्टेबर रोजी विषारी औषध प्राशन केले होते. अशोक यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले होते. त्यांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. उपचारादरम्यान 10 सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, भाऊ बहीण असा परिवार आहे.

Related posts: