|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विक्रमादित्य ‘साई’ ची वर्ल्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

विक्रमादित्य ‘साई’ ची वर्ल्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद 

विशेष प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूरचा ‘मिल्खासिंग’ म्हणून ओळखला जाणाऱया मॅरेथानमधील सात वर्षीय विक्रमादित्य साईश्वर गुंटूक याच्या बहाद्दर कामगिरीची दखल वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून येथे त्याची नोंद झाली असून यासंबंधीच्या नोंदीचे प्रमाणपत्र त्याला लवकरच दिले जाणार आहे.

  विशेष म्हणजे अवघ्या सात वर्षाच्या या बालकाने मॅरेथानमध्ये केलेल्या विश्वविक्रम नोंद वर्ल्ड आणि इंडिया बुकने घेतल्यामुळे सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इतकेच काय तर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅरेथानमध्ये सोलापूरचा दबदबा साईश्वरने निर्माण करतानाच, गिरणगावचे नाव सातासमुद्रापार पोहचवले आहे. अलीकडच्या काही वर्षात विविध खेळ प्रकारात सोलापुरच्या बहाद्दर खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने आपल्या सोलापूरचे नाव उज्वल करत क्रीडा क्षेत्रात अटकेपार झेंडा लावला आहे.  

  साईश्वर याने जम्मू काश्मीर येथील कारगील इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 21 किलोमीटर रन रेस 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमानात, कमी ऑक्सिजनमध्ये 16 हजार 608 फ्tढट उंच डोंगरी चढ धावून पुन्हा एकदा विश्वविक्रम केला आहे. त्याचा दखल वर्ल्ड आणि इंडिया बुकमध्ये घेण्यात आली आहे.

      मॅरेथान जगण्याची अन् विश्वविक्रमाची

वास्तविक साईश्वर अवघा सात वर्षाचा बालक आहे. जम्मू काश्मीरमध्ये अवघ्या 4 ते 5 अंश से तापमानामध्ये अत्यंत प्रतिकुल हवामानात त्याने डोंगरी भागात तब्बल 16 हजार 608 फूट म्हणजे तब्बल 21 कि.मी. चढाईची मॅरेथॉन पूर्ण केली. अवघे सात वर्षाचे वय आणि अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधील 21    किलोमीटर अंतराची चढाई  या दोन्ही आघाडय़ांचा विचार करता साईश्वर याने जम्मू काश्मीरसारख्या पडाडी प्रदेशात अत्यंत लहान वयामध्ये दोन्ही मॅरेथॉन  एकदाच जिंकली अर्थात जगण्याची आणि विश्वविक्रमाची.