|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हाडाचे दूखणे राहिले बाजूला, दुसरीच दुखणी अंगाशी

हाडाचे दूखणे राहिले बाजूला, दुसरीच दुखणी अंगाशी 

प्रतिनिधी/ सोलापूर

‘खोकला गेला अन् पडसे आले’ या अर्थाची म्हण आपल्याकडे आहे. मुख्य आजार बाजूलाच राहून दुसराच एखादा आजार उद्भवला जातो यावरून ही म्हण आपल्याकडे प्रचलीत झाली. समाजामध्ये अनेकांना या म्हणीचा प्रत्यय येतो. एखाद्या आजाराबद्दल चुकीचे निदान झाले आणि या निदानावरून चुकीची औषधे देण्यात आली तर त्याचे परिणाम संबंधीतांच्या शरीरावर उमटतात. रिऍक्श्न येते. असाच प्रकार सोलापुरात झाला आणि तोही दस्तुरखुद्द न्यायाधीश महोद्यांच्याबाबतीत. चुकीच्या औषधाची शिक्षा न्यायाधीश महोदयांना घ्यावी लागत आहे. पोलीसात दाखल झालेल्या गुन्हयावरून ही बाब समोर आली.

   दरम्यान हाडाचा त्रास राहिला बाजूला राहिला आणि  औषध दुकाराने दिलेले चुकीचे औषध खाल्याने न्यायाधीश महोद्ययांच्या शरीरावर परिणाम उमटले. त्यांच्या अंगाला खाज सुटण्याबरोबच सुजदेखील आली. औषध दुकानदारांच्या चुकीमुळे विनाकारण वेगळ्या आजाराची शिक्षा न्यायाधीश महोद्यांना सध्या भोगावी लागत आहे. यापुढे आणखीन त्यांना या †िशक्षेचे भोग किती दिवस भोगावे लागणार? याचे उत्तर डॉक्टरदेखील देवू शकले नाहीत. 

   जिल्हा न्यायाधिशांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे न देता तीच घटकद्रव्ये असणारी औषधे आहेत असे सांगण्याचा प्रकार मेडिकल दुकानदार व दुकानातील कर्मचाऱयाने केला. या प्रकरणात तिघांविरुध्द पोलीसात  गुन्हा दाखल झाला आहे.

 लक्ष्मण यल्लप्पा नाईकुडी (वय 42, रा. जुना पूना नाका,), शशांक चंद्रहास जाधव (वय 36, रा. विजापूर रोड,) व सुनिल श्रीमंत उगाडे (वय 40) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. रविवार 10 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायाधीश सुहासिनी उल्हास हेजीब (वय 45, रा. जिल्हा न्यायाधीश निवास क्रमांक, श्रध्दा निवास, गुरुनानक स्टेडियम समोर, सोलापूर) या हाडांचे डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडे तपासणी केली होती. यानंतर डॉक्टर कुलकर्णी यांनी काही औषधे हेजीब यांना लिहून दिली होती. औषधे लिहून दिलेला कागद घेऊन, न्यायाधिश हेजीब गोविंद मेडिकलमध्ये गेल्या होत्या. त्यांनी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांचा कागद मेडिकल दुकानात दिला. दुकानाचे मालक लक्ष्मण नाईकुडे यांच्यासह इतरांनी ते पाहून, लिहून दिलेली औषधे नाहीत पण तीच घटकद्रव्ये असलेली दुसऱया कंपनीची औषधे दुकानदाराने न्यायाधीश हेजीब यांना दिली.

    त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी मेडिकल दुकानामधून आणलेली औषधे घेतल्यानंतर मात्र हेजीब यांच्या अंगाला प्रंचड सूज आली. शिवाय त्यांच्या अंगास खाज झाली. यामुळे हेजीब यांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला असता, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी एक औषध चुकीचे दिल्याची माहिती दिली. तर अशा औषधांमुळे रुग्णाच्या जीवावर बेतू शकते, असा सल्लाही त्यांनी दिला. औषधे घेतल्याने आलेली सूज कमी होण्यास किती दिवस लागतील किंवा त्यासाठी किती खर्च येईल हे सांगता येणार नसल्याचाही अभिप्राय डॉक्टरांनी दिला आहे.

   याबाबत जिल्हा न्यायाधीश सुहासिनी हेजीब महोदया यांनी मेडिकल मालक आणि कामगाराविरुध्द दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात फसवणूक चुकीची औषधे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन समज नोटीस देऊन सोडून दिले आहे.

    न्यायाधीश महोद्ययांना ‘शिक्षा पे शिक्षा’

न्यायाधीश महोद्यांना हाडाच्या दुखाण्याचा मुळ त्रास आहे. तो कमी व्हावा, यासाठी   त्या डॉ. कुलकर्णी यांच्याकडे गेल्या होत्या. हा त्रास कमी व्हावा म्हणून कुलकर्णी यांनी औषधे लिहून दिली होती. ही औषधे खाण्यातून हा आजार बरा होणे इथं  पर्यंत ठीक पण हाडाची आजाराची औषधे खाण्यातून त्यांना सुज आणि अंग  खाजवणे असे दुसरेच दोन आजार उद्भवले. हे दोन आजार कमी होण्यासाठी पुन्हा  औषधे त्यांना घ्यावी लागत आहेत. ‘शिक्षा पे शिक्षा’ असाच तो काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला आहे.