|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रेवंडेत विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

रेवंडेत विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती 

प्रतिनिधी/ नागठाणे

पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने रेवंडे (ता. सातारा) येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींची निर्मिती केली.

रेवंडे हे सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरउंचावरचे गाव. येथील प्राथमिक शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतात. शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच सुबक, आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. शाळेतील शिक्षक संदीप पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याना शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नसल्याने या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखणे, प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर कमी करुन शाडूच्या मातीचा वापर वाढविणे, मुलांमधील कलागुणांना वाव देणे, असे अनेक उद्देश या उपक्रमातून साध्य झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

निर्माल्य पाण्यात न  टाकता या त्याचे खत कसे बनवावे, याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी  मुख्याध्यापक अधिकराव जाधव, सुनील शेडगे, प्रदीप शिंदे यांनी मार्गदर्शन केले. गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, केंद्रप्रमुख दादाजी बागुल यांनी अभिनंदन केले. या मुलांचे अनेकांनी कौतु केले.