|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विसर्जनाचं कामपण एसपींनी करायचं का?

विसर्जनाचं कामपण एसपींनी करायचं का? 

प्रतिनिधी/ सातारा

कायदा व सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम आहे, ते पोलीस करत आहेत. विसर्जन तळ्याची जागा नगरपालिकेने  ठरवायची आहे. मात्र, ती अद्याप ठरवलेली नाही. गुरुवारी नगरपालिकेने यावरती तोडगा काहीपण करुन काढायचा आहे. आमचे काम सोडून आता आम्ही विसर्जनाच्या तळ्यांना भेटी देण्याचे काम करु का?, असा संतप्त सवाल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी उपस्थित केला.

गेल्या तीन †िदवसांपासून विसर्जन तळे या मुद्यावरच काथ्याकुट सुरु आहे, परंतु तोडगा काही निघेना. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून मंगळवार तळे येथे विसर्जनाला परवानगी मिळाली म्हणून पेढे वाटण्यात आले, तर आज न्यायालयाने बंदी कायम ठेवण्यात आल्याचे जाहीर झाले. त्यामुळे नगरपालिकेचा नियोजन शून्य कारभाराला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जाम वैतागून गेले आहेत. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व काही महत्त्वपूर्ण अधिकाऱयांच्या बैठकी झाल्या. त्यानंतर अलंकार हॉल येथे मुख्याधिकारी गोरे, नगराध्यक्षा माधवी कदम, मोठय़ा मंडळाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बैठक घेतली.

यामध्ये गोडोली तळे, पोहण्याचा तलाव व जलसागर येथील खड्डय़ातील तळे या तीन †िठकाणांचा विचार करुन एक जागा पक्की करुन गुरुवारपर्यंत पोलिसांना कळवले, अशी सूचना पंकज देशमुख यांनी केली. दिवसभर विसर्जनाच्या बैठकी घेत बसू का?, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. तरीही अनेक मंडळाचे कार्यकर्ते मंगळवार तळ्यासाठी आग्रही दिसत होते. विसर्जन तळय़ाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे, त्यामुळे शहरवासीयांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.