|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बार्देश तालुक्यांत दोन दिवस पाण्याविना हाल

बार्देश तालुक्यांत दोन दिवस पाण्याविना हाल 

प्रतिनिधी/ म्हापसा

गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला म्हापशात अस्नोडाहून येणारी मुख्य जलवाहिनी करासवाडा येथे फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. परिणामी बार्देश तालुक्यत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. अभियंतावर्ग दिवसभर या कामानिमित्त जलवाहिनी दुरुस्त करण्यात मग्न होते.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी अस्नोडा पाणी प्रकल्पावरील पंप जळून गेल्याने म्हापसा व थिवी भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांचे हाल झाले. गुरुवारी सकाळी खात्याला गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने आजही पाणीपुरवठा होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related posts: