|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गँगवाडीत 9 ग्रॅम गांजा जप्त

गँगवाडीत 9 ग्रॅम गांजा जप्त 

माजी उपमहापौर गौराबाईंचाही समावेश

प्रतिनिधी/ बेळगाव

गँगवाडी परिसरात गावठी दारू आणि गांजा विक्री करणाऱयांवर माळमारुती पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधितांकडून 9.10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून आरोपींची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणात बेळगावच्या माजी उपमहापौर गौराबाई जयपाल लोंढे (वय 50), गुणवंता श्रीनिवास जबळी (वय 50), विजेंद्र लोंढे (वय 27), अजय लोंढे (वय 27, सर्व रा. गँगवाडी) व महम्मदगौस जोरीखान (वय 20, रा. टिपू सुलतान गल्ली) यांना पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात पाठविले आहे.

गावठी दारूच्या बरोबरीनेच गँगवाडी परिसरात गांजाही विकला जात असल्याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली होती. यावर पाळत ठेऊन छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर 9 ग्रॅम गांजाची किंमत 9 हजार 330 रुपये इतकी असून गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. 

 

Related posts: