|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विधानसौधला घेराव

विधानसौधला घेराव 

वार्ताहर/ रामदुर्ग

तालुक्यातील खानपेठ येथील इआयडी पॅरी शुगर्स व उदपुडी येथील शिवसागर साखर कारखान्याकडून सन 2016-17 सालातील प्रतिटन 305 प्रमाणे बाकी बिल देण्यात आले नाही. त्यामुळे 16 सप्टेंबरच्या आत शेतकऱयांच्या खात्यात उर्वरित बिल जमा करावे. अन्यथा 18 सप्टेंबर रोजी विधानसौधला घेराव घालण्यात येणार आहे, असा इशारा राज्य ऊस उत्पादक संघाच्या रामदुर्ग शाखेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन ग्रेड-2 तहसीलदार विजयकुमार कडकोळ यांना देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष शंकरगौडा होसगौडर, एस. बी. शिदनाळ, मारुती नलवडे, शासप्पा न्हावी, रुद्रगौडा पाटील, पंचप्पा गंगन्नवर, मारुती कोप्पद यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.