|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी नगरपालिकेवर ‘प्रशासकराज’

निपाणी नगरपालिकेवर ‘प्रशासकराज’ 

वार्ताहर/ निपाणी

निर्धारित वेळेत निवडणूक झाली, मतमोजणीतून निकाल जाहीर झाला. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षणातून सत्तेची गोळाबेरीज झाली, तोच आरक्षण बदलण्याचा इतिहास घडला. यातून कोर्टकचेरी सुरू झाली. न्यायालयाने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीला स्थगिती दिली. या सर्व घडामोडीत नगरपालिका सभागृहाचा कार्यकाळ बुधवारी सायंकाळी संपला. यामुळे जिल्हाधिकारी झियाऊल्ला यांनी पालिकेची सूत्रे हाती घेतली. यामुळे निपाणी नगरपालिकेवर ‘प्र’शासक ‘राज’ आल्याचे स्पष्ट झाले.

निपाणी नगरपालिका सभागृहाचा कार्यकाळ 12 रोजी संपुष्टात आला. यानंतर लागलीच बेळगाव येथे पालिका कारभाराची सूत्रे जिल्हाधिकारी झियाऊल्ला यांनी हाती घेतली. अशी माहिती आयुक्त दीपक हरदी यांनी दिली. ही प्रशासकीय राजवट आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर संपणार आहे. यामुळे निपाणीकरांसह नूतन नगरसेवकांचे लक्ष न्यायालयीन प्रक्रिया व निवडणूक तारखेकडे लागले आहे. नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपसह काँग्रेस पुरस्कृत शहर विकास आघाडीला काठावर पास केले. यानंतर आरक्षण जाहीर व बदलाच्या घडामोडी घडल्या. भाजपच्या बहुमताला ओव्हरटेक करत काँग्रेसने नगराध्यक्ष पदातून बाजी मारली आहे. असे असले तरी आता न्यायालयीन प्रक्रियाच यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

 

Related posts: