|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राजा लखमगौडा लॉ कॉलेजच्या हीरक महोत्सवाला राष्ट्रपतींची उपस्थिती

राजा लखमगौडा लॉ कॉलेजच्या हीरक महोत्सवाला राष्ट्रपतींची उपस्थिती 

प्रशासनाकडून खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक लॉ सोसायटी (केएलएस) आणि राजा लखमगौडा लॉ कॉलेज यांचा हीरक महोत्सव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत दि. 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम पार पडावा म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. त्यात शामियाना, सजावट करणारे कर्मचारी, राष्ट्रपती व पाहुण्यांच्या वाहनांचे पार्किंग, सुरक्षा आदींबाबत खबरदारीच्या योजना करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा प्राधिकरण, पोलीस अधिकारी व इतर सरकारी खात्यांकडून उत्तम सहकार्य लाभत आहे.

सदर कार्यक्रमासाठी फक्त आमंत्रण पत्रिका (पास) असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा सत्रन्यायाधीश, केंद्र-राज्य सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, विद्यापीठाचे अधिकारी, वकीलवर्ग, माजी विद्यार्थी अशा एकूण 5 हजार व्यक्तींचा समावेश आहे.

अतिमहनीय व्यक्तींना लाल रंगाचा व द्वितीय श्रेणीच्या व्यक्तींसाठी निळय़ा रंगाचा पास देण्यात आला आहे. यातील प्रथम व द्वितीय श्रेणीच्या व्यक्तींना कार्ड व पासच्या आधारे सोडण्यात येईल. तृतीय श्रेणीच्या व्यक्ती व इतरांना पोलीस आयुक्तांचा सहीशिक्का असलेल्या सीलबंद आमंत्रण पत्रिकेच्या आधारेच प्रवेश दिले जाईल.

पहिल्या गेटमधून फक्त लाल पास असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. त्यांना कार्यस्थळी जाण्यासाठी महनीय व्यक्तींना खानापूर रोडवरील मजगाव क्रॉसवरून उजवीकडे वळून पहिल्या गेटकडे जाता येईल. त्यांना वाहने उभी करण्यासाठी कार्यक्रम स्थळाबाहेर व्यवस्था करण्यात आली आहे.

दुसऱया गेटने निळे कार्ड असणाऱया पासधारकांनाच प्रवेश दिला जाईल. या व्यक्तींना बेम्को येथून डावीकडे वळून जीआयटीच्या दुसऱया गेटकडे जाता येईल. वाहने उभी करण्यासाठी गेट नं. 2 च्या बाहेर व्यवस्था करण्यात आली आहे.

Related posts: