|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » अरूण जेटलींना खोटे बोलण्याची सवय :ललित मोदी

अरूण जेटलींना खोटे बोलण्याची सवय :ललित मोदी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेले भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या मद्यसम्राट विजय माल्याने फरार होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतल्याचे सांगून देशभरात खळबळ उडवून दिली. माल्याच्या या कथित माहितीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या वादात आता भारतातून फरार झालेल्या ललित मोदीनेही उडी घेतली आहे.

विजय माल्याने केलेल्या दाव्याचे समर्थन करत ललित मोदीने ट्विट केले आहे. आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदीनं अरुण जेटली यांना खोटे बोलण्याची सवय असल्याचा आरोप करत त्यांची तुला सापासोबत केली आहे. विजय माल्या आणि अरुण जेटली यांच्या कथित भेटीबाबत बोलताना त्याने असेही म्हटले की, माल्यासोबत भेट झाल्याचे अनेकांना माहिती असतानाही जेटली ही बाब का नाकारत आहेत. अरुण जेटलींना खोटे बोलण्याची सवय आहे. एका सापाकडून आपण दुसऱया काय अपेक्षा ठेऊ शकतो, असे ट्वटि मोदीनं केले आहे. आपल्या ट्वटिमध्ये मोदीनं जेटलींना टॅगदेखील केले आहे.

 

Related posts: