|Monday, November 19, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » दगडूशेठ गणपतीला भक्ताकडून तब्बल 126 किलोंच्या मोदाकाचा प्रसाद

दगडूशेठ गणपतीला भक्ताकडून तब्बल 126 किलोंच्या मोदाकाचा प्रसाद 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्याच मानाचे स्थान असलेल्या या गणपतीला भाविक अतिशय भक्तीभावाने पूजा करतात. गणेशोत्सवाच्या काळात भक्त या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत थांबतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला नवसही बोलला जातो. मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर भक्त बाप्पाची पुन्हा भक्तीभावाने पूजाअर्चा करतात. अशाच बाप्पाच्या एका भक्ताने आपल्या या लाडक्मया दैवतासाठी एक अनोखी भेट दिली आहे. बाप्पाला आवडणाऱया मोदकाचा प्रसाद या भक्ताने दिला आहे. पण हा मोदक एक-दोन नाही तर तब्बल 126 किलोंचा आहे. यंदा मंडळाने 126 वर्ष पूर्ण केली असल्याने 126 किलोंचा मोदक करण्यात आला आहे.

आपण बोललेल्या नवसाची पूर्तता झाल्याने या भक्ताने हा मोदक अर्पण करण्यात आला. काका हलवाई यांनी हा मोदक बनवला आहे. हा मोदक पूर्णतः माव्यामध्ये बनविण्यात आला असून काजू, बदाम, पिस्ते, मनुके अशा सुकामेव्याने तो सजविण्यात आला आहे. याबरोबरच अतिशय आकर्षक दिसणाऱया या मोदकाला चांदीचा वर्खही लावण्यात आला आहे. मोदकाच्या वरच्या भागाला सोन्याचा वर्ख देण्यात आला आहे. गणेशापुढे हा मोदक अर्पण करण्यात आला असून त्याचा बाप्पाला नैवेद्य दाखविण्यात आला. हा मोदक भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.

 

Related posts: