|Friday, July 19, 2019
You are here: Home » विविधा » दगडूशेठ गणपतीसमोर महिलांचे अथर्वशीर्ष पठण

दगडूशेठ गणपतीसमोर महिलांचे अथर्वशीर्ष पठण 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांना शुक्रवारी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेले.

दरवषीप्रमाणे यंदाही अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. शंख निनादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेली 30 वर्षे सुरू असलेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे यंदा 31 वे वर्ष आहे. प्रत्येक महिलेला ट्रस्टच्या वतीने उपरण, बॅच तसेच प्रसाद देण्यात आला. हजारो महिलांच्या उपस्थितीत आणि शी गणेशाच्या जय घोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. ‘जय गणेश, जय गणेश’च्या घोषणा देत महिलांनी याला मोठय़ प्रमाणावर प्रतिसाद दिला.

महिलांबरोबरच लहान मुले, ज्ये÷ व्यक्ती, व पुरुष मंडळी या अथर्वशीर्ष पठणात सहभागी झाले होते. यावेळी आमदार नीलम गोऱहे, उद्योजिका रितू छाब्रिया, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.