|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » जस्टिस रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायधीश

जस्टिस रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायधीश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जस्टिस रंजन गोगोई यांची भारताचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा दोन ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. जस्टिस रंजन गोगोई तीन ऑक्टोबरपासून पदभार सांभाळतील.

सरन्यायाधीश म्हणून जस्टिस गोगोईंना 13 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळतील.रंजन गोगोई हे मूळचे आसामचे आहेत. त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री होते. जस्टिस गोगोईंचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. गुवाहटी हायकोर्टात त्यांनी 1978 साली वकील म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 28 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांची गुवाहटी हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

9 सप्टेंबर 2010 रोजी जस्टिस रंजन गोगोई यांची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून बदली झाली. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातच त्यांना बढती मिळाली आणि ते 12 फेब्रुवारी 2011 रोजी मुख्य न्यायमूर्ती बनले.23 एप्रिल 2012 रोजी जस्टिस रंजन गोगोई यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते 3 ऑक्टोबरपासून सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळतील.