|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » पाच देशांच्या युद्ध सरावास सुरूवात

पाच देशांच्या युद्ध सरावास सुरूवात 

ऑनलाईन टीम / पुणे :

परदेशातील सैन्यांसोबतातील संबंध आणि उपनगरी भागातील दहशतवादाला आळा घालण्याचे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून भारतीय लष्करातील सदर्न कमांड सोबत भारत, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका आणि म्यानमार या देशाच्या सैन्यदलांनी लष्करी सराव सुरु केला आहे. 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान पुण्याजवळील औंधमध्ये हा लष्करी चालू आहे.

बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्नकिल अ‍Ÿण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स 18 या पहिल्या लष्करी युध्द सराव घेण्यात येत आहे. या लष्करी सरावात भारत, बांग्लादेश, म्यानमार, भूतान आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकडय़ांचा सहभाग आहे. बिम्सटेकमधील देशांना दहशतवाद्यांशी लढण्याच्या एकमेकांच्या पद्धती, एकमेकांच्या लष्कराची कार्यपद्धती समजावी आणि त्यांच्यातील परस्पर सहकार्य वाढावे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे. निमशहरी भागातील दहशतवाद्यांचा बिमोड ही सरावाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या युद्धसरावादरम्यान उद्या पाचही देशांच्या लष्कर प्रमुखांच्या एकत्रित परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत या युद्ध सरावाचा समारोप होणार आहे. सहभागी देशांचे प्रत्येकी पाच लष्करी अधिकारी आणि पंचवीस ज्युनिअर कमिशन अधिकारी या युद्ध सरावामध्ये सहभागी झाले आहेत. भारताचे माजी राजदूत जी. पार्थसारथी संयुक्त युद्ध सरावाचे निरीक्षक म्हणून काम करीत असून अशा पध्दतीचा लष्करी सराव म्यानमार, बांग्लादेश, भूतान येथे झाला होता.