|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्रायल-गाझा सीमेवर संघर्ष, 3 पॅलेस्टिनींचा मृत्यू

इस्रायल-गाझा सीमेवर संघर्ष, 3 पॅलेस्टिनींचा मृत्यू 

जेरूसलेम

 इस्रायल-गाझा सीमेवर पॅलेस्टिनी निदर्शक आणि इस्रायलच्या सैन्यादरम्यान संघर्ष झाला आहे. या संघर्षात 3 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून 248 जण जखमी झाले आहेत. इस्रायलला लागून असलेल्या सीमेवर हजारो निदर्शक एकत्र आले होते. यादरम्यान इस्रायलच्या सैन्याच्या कारवाईत 3 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. गंभीर जखम झाल्याने 120 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती गाझा आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल-कद्रा यांनी दिली.गाझापट्टीला लागून असलेल्या इस्रायल सीमेवर हजारो पॅलेस्टिनी 25 व्या ग्रेट मार्च ऑफ रिर्टनमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आले होते. इस्रायलविरोधी घोषणा देत निदर्शक पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवित होते. काही जणांनी पेटते फुगे इस्रायलच्या दिशेने सोडल्याने संघर्ष निर्माण झाला. काही निदर्शक सीमेवरील काटेरी कुंपण तोडून इस्रायलच्या सीमेत दाखल झाले. निदर्शकांनी सैन्यतळावर 3 बॉम्ब फेकल्याने अनेक ठिकाणी आग लागल्याची माहिती इस्रायलच्या सैन्याने दिली.