|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » टॅक्सींना डिजिटल मीटरसाठी तीन कंपन्यांच्या निविदा

टॅक्सींना डिजिटल मीटरसाठी तीन कंपन्यांच्या निविदा 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यासंदंर्भात तीन कंपन्यांनी निविदा सादर करून आपले मीटर पाठविले आहेत. त्यांची चांचणी झाल्यानंतर योग्य कंपनीला कंत्राट दिले जाईल, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली आहे. पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

डिजिटल मीटर कुठल्या प्रकारचे असावेत यावर नवी व्याख्या केंद्र सरकारने तयार केली आहे व त्या तत्वप्रणालीवर या तीन कंपन्यांच्या मीटरची चाचणी होणार आहे. तिन्ही कंपन्या त्यात नापास झाल्यास नव्याने निविदा जारी केली जाईल. पण योग्यतेकडे तडजोड केली जाणार नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

चाचणीसाठी डिजिटल मीटर पाठवून बराच काळ झाला, त्याचा अहवाल कुठे पोहोचला याची चौकशी खंडपीठाने केली तेव्हा अजून अहवाल आला नसल्याचे उत्तर सरकारी वकिलांनी दिले. त्या चाचणीची चौकशी लवकर करा व 19 सप्टेंबर पर्यंत उत्तर द्या, असे सुचवून खंडपीठाने पुढील सुनावणी 19 रोजी ठेवली.