|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मंगलमूर्तीचे विसर्जन करताना पावित्र्य पाळा

बुध. दि. 19 ते 25 सप्टेंबर 2018

सोयरसुतक वगैरे कारणाने चतुर्थीला गणपती आणता आला नाही, पण अनंत चतुर्थीपर्यंत आणल्यास चालेल का? असे काही जणांनी विचारलेले आहे. चतुर्थीचे महत्त्व नंतरच्या तिथीला येत नाही. चतुर्थीव्यतिरिक्त इतर दिवशी गणपती आणू नये. एक वर्ष चुकले म्हणून आभाळ कोसळत नाही, अथवा गणपतीचा कोप होत नाही, हे लक्षात घ्यावे. पुढील वर्षी गणपती आणता येतो. त्याला कोणताही दोष नाही, सोयरसुतकात त्याचे पावित्र्य पाळले जात नाही. गणपती पोचविताना गांभीर्याने पोचवावा. गणपतीच्या मागील बाजूस देखील एक छोटेसे गणपतीचे चित्र लावून ठेवावे. त्यामुळे लक्ष्मीची कृपा रहाते. गणपती जोपर्यंत घरी आहे, तोपर्यंत सर्व तऱहेचे पावित्र्य पाळावे. गणपती अथर्वशिर्षाबरोबरच जर गणेश अपामार्जन स्तोत्राचे 21 वेळा वाचन केल्यास  घरातील करणीबाधा, रोगराई, पीडा, बाधिक दोष, शाप, शिक्षणातील अडथळे व आर्थिक समस्या दूर होतात. 23 सप्टेंबरला पूर्ण दिवस अनंत चतुर्दशी आहे. या काळात घरगुती गणेश मूर्तीची पूजा करून त्यांचे विसर्जन करावे. पूजा करून झाल्यावर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता अर्पण कराव्यात. नंतर केव्हाही मूर्तीचे पाण्यात विसर्जन करता येईल. गणेशमूर्ती आणताना उत्साह असावा पण पोचविताना मात्र गांभीर्याने पोचवावे असा नियम आहे. गणपती हे मांगल्याचे प्रतीक आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लोक नको ती गाणी लावून दारुच्या नशेत बेभान होऊन नाचत असतात. आपण कुणासमोर नाचत आहोत हे त्या बेभान तरुणांना कळत नाही. त्यावेळी काही वाटत नाही, पण कालांतराने त्याचे दुष्परीणाम जाणवू लागतात. गणपती मूर्ती आणताना धक्का लागल्यास प्रचंड खर्चाच्या शांती करण्यास सांगतात पण मूर्ती पोचविताना त्या मूर्तीचे जे हाल केले जातात, त्याबद्दल कुणी काहीच आवाज काढत नाहीत, हे योग्य नाही. मूर्ती पेनच्या सहाय्याने ट्रकवरून उचलून पाण्यात विसर्जित करताना मूर्तीची मोडतोड होते. मूर्ती पाण्यात बुडविताना लोक त्या मूर्तीवर अक्षरश: नाचत असतात हा अक्षम्य अपराध आहे. गणपती ही सुखसमृद्धी व बुद्धीची देवता आहे. तिचा कोप झाल्यास पुढे काय होईल याचा विचार करावा. या साऱया बाबींचा पूर्ण विचार करून गणेश मूर्तीच्या पावित्र्याला धक्का न लावता शांतपणे मूर्तीचे विसर्जन करावे. काही गावात जागृत गणपती आहे, असे सांगून अक्षरश: बाजार मांडलेला दिसून येतो. त्यातून मिळणाऱया पैशासाठी कोर्टखटलेही चाललेले दिसून येतात. अशामुळेही मूर्तीचे पावित्र्य भंग होते. गणपती कोणताही असला तरी तो एकच  असतो. घरात पूजला काय अथवा लालबागला जाऊन दर्शन घेतले काय, सर्वाचे फळ एकच असते. श्रद्धेने घरातल्या गणपतीला नमस्कार केला तरी तो पावतोच. घरातील वडीलधाऱया  मंडळींनीही मुलांना गणेश विसर्जनाच्यावेळी सर्व तऱहेचे पावित्र्य पाळण्यास सांगावे, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर अंडी, आमलेट व मांसाहाराची दुकानेही घातलेली आढळतात. असे चुकूनही करू नका. कारण दैवी शक्ती कोपली तर त्याचे परिणाम अत्यंत प्रखर असे असतात व त्याचे दृक प्रत्ययही आलेले पहाण्यात आहेत.

मेष

वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील. भागीदारी व्यवसाय, प्रवास, धनलाभ याबाबतीत अनुकूलता राहील. धनलाभाच्या दृष्टीने ग्रहमान  चांगले आहे. महत्त्वाचे व्यवहार यशस्वी ठरतील. विवाहाच्या दृष्टीने अनुकूल योग. नोकरी व्यवसायात मनाजोगती प्रगती. अडलेली मंगलकार्ये मार्गस्थ होतील. गुरु, शुक्राचा शुभयोग अनेक बाबतीत लाभदायक.


वृषभ

रवि, बुध सहाव्या स्थानावर प्रभाव टाकत आहे. सर्व शत्रू थंड पडतील. पूर्वापार चालत आलेले शत्रुत्व नाहीसे होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. बिघडलेले नातेसंबंध सुधारतील. नोकरी, उद्योग, व्यवसाय उत्तम चालेल. धनलाभाच्या बाबतीत हा योग चांगला आहे. या शुभयोगावर केलेले कोणतेही महत्त्वाचे काम मोठे यश मिळवून देईल.


मिथुन

गैरसमजाला वाव मिळेल असे वागू नका. काही निर्णायक स्वरुपातील कामे पूर्ण होतील. अध्यात्मिक बाबतीत चांगले फळ. घरातील वातावरण धार्मिक राहील. फार मोठे यश देऊन जाईल. काही नवे करार मदार व व्यवहाराची सुरुवात होईल. किमती वस्तू खरेदीची हौस पूर्ण कराल. अनंत चतुर्दशीच्या मूहूर्तावर चांगले संकल्प करा.


कर्क

कौटुंबिक सौख्य चांगले राहील. वास्तुदोष असेल तर तो नष्ट करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा अनंत चतुर्दशीनंतर त्याचे परिणाम जाणवतील. घराण्यातील काही पूर्वार्जित दोष असतील तर ते नाहीसे होतील. घरात सर्व तऱहेने पावित्र्य ठेवा. त्याचा निश्चित लाभ होईल. धनलाभाच्या दृष्टीने अतिशय चांगले योग. वाहन व स्वत:ची वास्तू व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असाल तर चांगले यश मिळेल.


सिंह

ग्रहमान सर्व बाबतीत शुभदायक आहे. काही गोष्टी मनात असतात, पण त्या पूर्ण होतीलच असे नसते. यावेळी मात्र त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरतील. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल योग. नवे व्यवहार सुरू होतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे योग आहेत, पण व्यसन व इतर अनिष्ट बाबींपासून दूर रहा.


कन्या

मंगलमूर्तीच्या पूजनाने लक्ष्मीची कृपा लाभेल. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक व योग्य दिशेने असतील तर निश्चित यश मिळेल. प्रवास व भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तम योग. देवाधर्माच्या बाबतीत कोणतीही कसर ठेवू नका. पुढील काळाच्या अंदाज घेऊन काही नवीन संकल्प करा. निश्चित सिद्ध होईल. कुणाच्याही व्यवहारात हस्तक्षेप करू नका.


तुळ

व्यावसायिक बाबतीत चुकलेले निर्णय सुधारण्याची संधी मिळेल. व्यवसायातून धनलाभाचे योग येतील. काही गंभीर समस्यातून व संकटातून पार पडाल. शारीरिक क्लेश असतील तर ते दूर होतील. नवे मित्रमैत्रिणी मिळतील. व्यसनी मित्रांपासून दूर रहा. नोकरीनिमित्त दूरचा प्रवास घडू शकेल. मोबाईल चोरीला जाण्याची शक्मयता.


वृश्चिक

अध्यात्मिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील. योगसाधना, देवधर्म, ध्यानधारणा, जपजाप्य यांची आवड असेल तर त्यात चांगली प्रगती. मामा, मावशी, आत्या यांच्या बाबतीत असलेल्या काही समस्या सुटतील. समझोत्याची बोलणी सुरू होतील. किमती चीजा खरेदी करू शकाल. दूरवरचे प्रवास योग.


धनु

लाभस्थानी गुरु आहे. तोपर्यंत अवघड कामे करून घ्यावीत. महत्त्वाकांक्षा पूर्तीचा आनंद मिळेल. परीक्षेत चांगले यश. सतत नवनव्या भेटवस्तू मिळण्याचे योग. गैरसमज दूर झाल्याने शत्रू मित्र होतील. त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. साडेसातीचा प्रभाव असल्याने वाढत्या खर्चामुळे घरगुती वातावरण तणावग्रस्त राहील. गैरसमजाला वाव मिळेल. काही निर्णायक स्वरुपातील कामे पूर्ण होतील.


मकर

कर्मस्थानी गुरु आहे. नोकरी व्यवसायातील अडलेली कामे त्वरित करून घ्या. नोकरी, विवाह, संतती, भाग्योदय तसेच धनलाभाच्या दृष्टीने लाभदायक योग व्यावसायिक समस्या मिटतील. काही अधिकार काढून घेतले जातील पण त्याऐवजी मोठय़ा जबाबदाऱया पडण्याची शक्मयता आहे. काही नवे व्यवसायदेखील सुरू करू शकाल.


कुंभ

आतापर्यंत अडलेले आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील. कौटुंबिक व वास्तुसंदर्भात शुभ घटना घडतील. काही कारणाने रखडलेले वास्तुचे काम या आठवडय़ात सुरू होईल. आर्थिक अडचणी कमी होतील. मानसिक स्थिती चांगली राहील. लोभ, मोह, माया यांचा वापर करून काहीजण तुमच्याकडून मोठी कामे करून घेतील.


मीन

मंगलमूर्तीच्या पूजनाने घराण्यातील शापीत दोष नाहीसे होतील. रेल्वे प्रवास, पत्रव्यवहार,  महत्त्वाच्या वाटाघाटी, जगाविषयक बोलणी या संदर्भात उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवनातील बिघडलेले संबंध पुन्हा सुरळीत होतील. उत्तरेकडील व्यवहारात फायदा होऊ शकेल, पण नियोजनाशिवाय कामात हात घालू नका. प्रसंगावधानाने संकटे टळतील. नोकरीविषयक न होणाऱया कामासाठी प्रयत्न करीत असाल तर चांगले यश मिळेल.