|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामस्वच्छतेत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग अव्वल

ग्रामस्वच्छतेत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग अव्वल 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : कुशेवाडा ग्रा. पं. प्रथम,  पावणाई तृतीय

प्रतिनिधी / ओरोस:

 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2017-18 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाड ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. देवगड तालुक्यातील पावणाई ग्रामपंचायतीला कोकण विभागात तिसरा क्रमांक मिळाला आहे.

सांडपाणी व्यवस्थापनाबरोबरच शासन निर्णयाप्रमाणे स्वच्छतेबाबतचे निकष पूर्ण करणाऱया ग्रामपंचायतींसाठी राष्ट्ऱसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये जिल्हास्तरावर कुशेवाडा ग्रामपंचायतीने प्रथम, तर पावणाई ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींची निवड विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात आली होती.

विभागीय तपासणी समिती सदस्य सचिव तथा उपायुक्त भारत शेडगे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय समितीने या दोन्ही ग्रामपंचायतींची तपासणी केली होती. 100 गुणांच्या या स्पर्धेत विभागस्तरावर कुशेवाडा ग्रामपंचायतीला 95, तर पावणाई ग्रामपंचायतीला 93 गुण मिळाले. कुशेवाडा ग्रामपंचायतीला 10 लाख रु., तर पावणाई ग्रामपंचायतीला सहा लाखांचे बक्षीस प्राप्त होणार आहे.

गतवर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले व वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे ग्रामपंचायतीने बाजी मारली होती. यावर्षीही विभाग स्तरावर दोन ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवल्याबद्दल जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, पाणी व स्वच्छता मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts: