|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये स्वाईन फ्लयूने तिघांचा मृत्यू

नाशिकमध्ये स्वाईन फ्लयूने तिघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला.

शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असताना या गणेशोत्सवावर स्वाईन फ्ल्यूसह साथीच्या आजारांचे सावट आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. जुलै महिन्यापासून आजार अधिक बळावला आहे.

 

गेल्या दीड-दोन महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने 20 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 100 हून जास्त जणांना लागण झाली. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 18, तर जिह्यातील इतर रुग्णलयांमध्ये 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

स्वाईन फ्ल्यूच्या औषधवरचे एफडीएचे निर्बंध हटवण्यात आल्याने मेडिकल स्टोअर्समध्ये औषधसाठा उपलब्ध झाला असून, जिल्हा रुग्णलयात 40 हजाराहून अधिक टॉमी फ्ल्यूच्या गोळय़ा उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयातही या गोळय़ांचा पुरवठा केला जात आहे.

 

Related posts: