|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रुकडीत आदिशक्ती महिला विकास मंचचे उद्घाटन

रुकडीत आदिशक्ती महिला विकास मंचचे उद्घाटन 

वार्ताहर/ रूकडी

महिलांचा  सर्वांगीण  विकास हेच आदिशक्तीचे मुख्य ध्येय असुन, त्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचे काम बचतगटा मार्फत केले जाणार असुन, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या मधील आदिशक्ती एकवटून सामाजिक आणि कौटूंबिक समस्या सोडविण्यासाठी आदिशक्ती महिला विकास मंचच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन या मंचच्या संस्थापिका सौ. वेदांतिका माने यांनी व्यक्त केले.

त्या नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या आदिशक्ती महिला विकास मंचच्या ऊदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने तर प्रमूख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी ऊपाध्यक्ष धैर्यशील माने व झी मराठी हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी हे ऊपस्थित होते . प्रारंभी ऊपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. यानंतर मंचच्या नामफलकाचे ऊदघाटन माजी खा. श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्वागत व प्रास्ताविक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोलदत्त कुलकर्णी यांनी केले.

यावेळी बोलताना माजी खा.निवेदिता माने म्हणाल्या, आदिशक्तीच्या माध्यमातून बेरोजगार स्त्रियांना  आर्थिक पाठबळ मिळाले तर त्यांना त्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण व कौंटूंबिक ऊदर निर्वाह चांगल्या पध्दतीने पूर्ण करता येईल. दरम्यान, के.डी.सी.सी. बॅंकेचे राजेंद्र रायकर यांनी बचत गटाच्या योजना सांगितल्या. माजी जि. प. उपाध्यक्ष धैर्यशील माने, तंटामुक्त समिती अध्यक्ष अमोलदत्त कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांनी उपस्थित महिलांचे विनोदी शैलीत मनोरंजन केले.

या महिला विकास मंचच्या ऊदघाटन प्रसंगी हळदी – कुंकू तसेच झी मराठी हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांच्या हास्य-विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रुकडी शाखेच्या अध्यक्षा श्रुतिका कुलकर्णी, सरपंच रफिक कलावंत, ऊपसरपंच शितल खोत तसेच सर्व ग्रा.पं. सदस्य ,हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती शुक्राना मकानदार, जिल्हा परिषद माजी सदस्य बबलू मकानदार, माजी सरपंच मिनाक्षी अपराध, ग्रामपंचायत सदस्या अंजना जाधव, प्रीती घाटगे, बानुबी नदाफ, सरीता कांबळे, मनिषा कांबळे, यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व शेवटी आभार जयमाला घाटगे यांनी मानले.