|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » डॉल्बीविरोधात सातारा पोलिसांची रॅली

डॉल्बीविरोधात सातारा पोलिसांची रॅली 

ऑनलाईन टीम / सातारा :

उच्च न्यायालयाने डॉल्बीच्या निर्णयाबाबत पुढची तारीख दिली असताना, साताऱयात डॉल्बी वाजणार, या खासदार उदयनराजे यांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस डॉल्बीविरोधात स्वतः रस्त्यावर उतरली आहे.

विशेष म्हणजे, सातारा जिह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखही या रॅलीत सहभागी झाले होते. स्वतः पोलिसांनीच रस्त्यावर उतरण्याचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण म्हणावे. सातारा पोलिसांनी शाळकरी विद्यार्थ्यांना डॉल्बी विरोधातल्या भूमिकेमध्ये सहभागी करुन, शहरातून खास रॅली काढली. यामध्ये स्वतः एसपी पंकज देशमुख हेसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भारतीय संस्कृतीतील मुलींचा ढोल-ताशा आणि पोलिसांचा बँड पथक हे विशेष. विद्यार्थ्यांच्या हातात डॉल्बी विरोधातील फलकही देण्यात आले होते. दरम्यान, डॉल्बी विरोधातली भूमिका पोलिसांची निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र उदयनराजे यांनी दिलेल्या आव्हानाला हे पोलिसांचे एक वेगळे आव्हान म्हणावे लागेल.

Related posts: