|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News » भीमा कोरेगाव प्रकरणातील 5 संशयीतांची नजरकैद सोमवारपर्यंत कायम

भीमा कोरेगाव प्रकरणातील 5 संशयीतांची नजरकैद सोमवारपर्यंत कायम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नजरकैदेत असलेल्या पाच जणांची अद्याप सुटका झालेली नाही. आता सोमवारी याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. या पाच जणांच्या सुटकेसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे, तर अटकेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र पुणे पोलिसांनी त्याला विरोध करत, अटकेतील लोक हिंसा भडकवण्याच्या कटात सहभागी होते, असा दावा केला होता.

न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुणे पोलिसांना शनिवारपर्यंत संपूर्ण खटल्याचा तपशील कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले. तर याचिकाकर्त्यांनाही लेखी दस्तऐवज जमा करण्यास सांगण्यात आले आहे. जर पुरावे बनावट आढळल्यास खटलाच रद्द करु, असे कोर्टाने म्हटले होते.

Related posts: