|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी दुचाकीची चोरी ; दोन चोरांना पकडण्यात पोलिसांना यश

गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी दुचाकीची चोरी ; दोन चोरांना पकडण्यात पोलिसांना यश 

ऑनलाईन टीम / सांगली :

चैन करण्यासाठी आणि गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी दुचाकी चोरणाऱया दोघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून तब्बल सहा लाख रुपये किंमतीच्या 12 मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. साहिल मौला पटेल आणि दगडू रामा कुकडे अशी आरोपींची नावे असून दोघेही महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहेत.

गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी आणि चैन करण्यासाठी साहिल पटेलकडे पैसे नसायचे. त्यामुळे त्याने बाईक चोरीचा मार्ग अवलंबून दुचाकी चोरीची मालिका रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोघांकडून सांगलीतील सात, तर अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच असे 12 दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सांगली पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ढालगावमध्ये छापा टाकून ही कारवाई केली. सांगली शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या गुन्हय़ात वाढ झाली होती. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा आणि अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या गुह्यांची दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. चोरलेल्या दुचाकी त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना अवघ्या दहा ते पंधरा हजारात विकल्या होत्या. कागदपत्रे पुन्हा देतो, असे सांगून त्यांनी या दुचाकींची विक्री केली होती. साहिल हॅण्डल लॉक न केलेल्याच दुचाकी चोरीत असे. त्यानंतर दगडू कुकडे याच्या मदतीने तो दुचाकी विकत असे. न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related posts: