|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज मेहर यांच्या कविता मानवतावादी

राज मेहर यांच्या कविता मानवतावादी 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

   लोककवी राज मेहर यांच्या कविता मानवतावादी भूमिका घेणाऱया आहेत. त्या विविध मानवी मूल्यांवर तसेच समता, लोकशाही, मानवी व्यवहार यावर त्या प्रखर भाष्य करतात. असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

ते राज मेहर लिखित उद्याचे स्टँड बाय सूर्य या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कविता संग्रहाचे लेखक ऍड. कृष्णा पाटील, दिलीप म्हैसाळकर यांच्या हस्ते पुसतकाचे प्रकाशन झाले.

 यावेळी ऍड. कृष्णा पाटील, शाहीर संभाजी भगत, डॉ. विठ्ठल शिंदे राज मेहर, दिलीप म्हैसाळकर, टी. एल. पाटील, मच्छिंद्र कांबळे, मंदार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल म्हमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर आभार कबीर नाईकनवारे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रविण राघवन यांनी केले.