|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » मर्सिडीस-बेन्झ इंडियाकडून नवीन कारचे अनावरण

मर्सिडीस-बेन्झ इंडियाकडून नवीन कारचे अनावरण 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

आलिशान गाडय़ांची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेन्झने आज आपल्या सी-क्लास गाडय़ांची नवी आवृत्ती बाजारात दाखल करत आपली उत्पादन श्रेणी आणखी सशक्त केली आहे. कंपनीच्या या सर्वाधिक एक्झेक्युटिव्ह सलून गाडय़ांच्या श्रेणीची ही पाचवी आवृत्ती आहे. नव्या सी-क्लास गाडीमध्ये असाधारण ऐषआरामाची प्रगत डिझाइन डायनॅमिक्सशी सांगड घालण्यात आली आहे. अतुलनीय लक्झरी अपॉइंटमेट्स, अतिप्रगत मल्टिमीडिया सिस्टिम ही वैशिष्टय़े या नव्या आवृत्तीचा भाग आहेतच शिवाय सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांमध्येही कोणतीही उणीव ठेवण्यात आलेली नाही. नव्या सी-क्लास गाडय़ांच्या श्ा़खsणीमध्ये सी 220 डी प्रोग्रेसिव्ह, दि सी 220 डी प्राइम आणि सगळ्यात शक्तीशाली सी 300 डी एएमजी लाईन या गाडय़ांचा समावेश आहे. नव्या सी-क्लास गाडीला एका नव्या आणि शक्तीशाली बीएस वीआय इंजिनचे बळ लाभले आहे. सी 220 डी आणि सी 300 डी एएमजी लाईन या गाडय़ांमध्ये फोर सिलिंडर ओएम 654 डिझेल पावरटेन बसविण्यात आले आहे. मर्सिडीझ-बेन्झ इंडियाच्या सेल्स व मार्केटिंग विभागाचे व्हाइस प्रेसिडंट श्री. मायकल जॉप यांनी या नव्या सी-क्लासचे अनावरण पेले. यापैकी सी 220 डी ही गाडी मर्सिडीझ बेन्झच्या देशभरातील सर्व वितरकांकडे उपलब्ध असणार आहे. तर सी 300 डी चे आगमन मात्र 2018 च्या चौथ्या तिमाहीमध्ये होणार आहे.

 

Related posts: