|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पधरा दिवसांनी पावसाचे पुनरागमन

पधरा दिवसांनी पावसाचे पुनरागमन 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

पंधरादिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने गुरुवारी हजेरी लावली. सुमारे अर्धातास मुसळधार सरी सुरू होत्या. उन्हाने हैराण झालेल्या शहरावासियांना पावसाने दिलासा मिळाला. जिल्हय़ाच्या अन्य भागाताही काही ठाकणी पाऊस झाल्याने खरीप पिकांना संजीवनी मिळाली.

  दरम्यान या पावसाने मात्र गणेश मंडळाचे कार्यकर्ते, गणेशभक्त मात्र काहीसे धास्तावले आहेत. बुधवारी रात्री देखावे पाहण्यासाठी शहरातून चांगलीच गर्दी दिसून आली. गुरुवारी मात्र हा उत्साह ओसरल्याचे दिसून आले. पुढील तीन दिवसात पावसाने किमान सायंकाळनंतर तरी उघडीप द्यावी अशी प्राथना गणेशभक्त करत होते.

जिल्हय़ात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर चिंतेचे सावट होते. सोयाबिन, भात, ज्वारी, कडधान्यासारखी पिकांनी माना टाकल्या होत. वाढ खुटल्याने उत्पादानवरही परिणाम होणार अशी शक्यता वर्तवली जात होती.  हंगामाच्या सुरवातीच्या टप्प्यात दमदार पाऊस झाल्याने पिकांची चांगली वाढ झाली. त्यानंतर मात्र सलग पडलेल्या पावसाने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. पिके कुजल्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर मात्र पावसनो दीर्घकाळ विश्रीती घेतल्याने माळरानावरील पिके वाळण्याच्या अवस्थेत होती. निदान उरला सुरला हंगाम तरी हाताला लागावा यासाठी दमदार पाऊस पडावा अशी शेतकरी प्रार्थना करीत होता. 

पावसाने अचानक दडी मारल्यामुळे सिंचन योजनांद्वारे पिकांना पाणी देऊन  जीवदान देण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरु होती. अनियमित वीज पुरवठय़ामुळे   पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रभर शिवारातच असल्याचे चित्र होते. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत. गरुवारी दुपारच्या सुमारास पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

 

Related posts: