|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » जखमी नदालला एटीपी स्पर्धा हुकणार

जखमी नदालला एटीपी स्पर्धा हुकणार 

वृत्तसंस्था /बार्सिलोना :

स्पेनचा टॉफ सीडेड टेनिसपटू राफेल नदालला दुखापत झाल्याने त्याला एटीपी टूरवरील काही स्पर्धांना मुकावे लागणार आहे. एटीपी टूरवरील आशियाई टप्प्यात आपण सहभागी होवू शकणार नाही, असे नदालने सांगितले.

अलिकडेच सर्बियाच्या जोकोव्हिकने अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. आता एटीपीच्या मानांकनात जोकोव्हिककडून नदालच्या अग्रस्थानाला धोका निर्माण होवू शकतो. अमेरिकन टेनिस स्पर्धेत खेळताना नदालच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोविरूद्धच्या उपांत्य लढतीत नदालला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले होते. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सर्बियाच्या जोकोव्हिकने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. जोकोव्हिकचे हे अमेरिकन टेनिस स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे. या कामगिरीमुळे एटीपीच्या मानांकनात जोकोव्हिकने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. नदाल पहिल्या, फेडरर दुसऱया तर जोकोव्हिक तिसऱया स्थानावर आहे. दुखापतीमुळे नदालला पुढील महिन्यात बिजिंग आणि शांघाय येथे होणाऱया एटीपी स्पर्धांना मुकावे लागणार आहे.