|Monday, December 10, 2018
You are here: Home » क्रिडा » मानांकनातील सुधारणेवर मनिकाचे लक्ष

मानांकनातील सुधारणेवर मनिकाचे लक्ष 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

दिल्लीची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राचे लक्ष आता मानांकनातील सुधारणेवर राहील. अलिकडे बात्राची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी दर्जेदार झाल्याने तिला अर्जुन पुरस्कार देण्यात आला पण प्रशिक्षक संदीप गुप्ता यांची द्रौणाचार्य पुरस्कार मिळविण्याची संधी थोडक्यात हुकली.

चालूवर्ष अखेरीस महिला टेबल टेनिसपटूंच्या मानांकन यादीतील पहिल्या 30 खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे बात्राने म्हटले आहे. संदीप गुप्ता यांची दौणाचार्य पुरस्कारासाठी निवड करणे जरूरीचे होते. गुप्ताना सलग दुसऱयांदा द्रौणचार्य पुरस्काराने हुलकावणी दिली आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिका बात्राने सुवर्णपदक तर त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी आपले प्रयत्न चालू असल्याचे बात्राने म्हटले आहे.

 

Related posts: