बेलारूसची अझारेन्का शेवटच्या आठ खेळाडूंत

वृत्तसंस्था /टोकियो :
येथे सुरू असलेल्या पॅन पॅसिफिक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत बेलारूसची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंकाने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात अझारेंकाने ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. 2016 च्या अखेरीस माता बनलेल्या अझारेंकाने हा सामना एकतर्फी जिंकला आता ती महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत पहिल्या दहा टेनिसपटूमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या अझारेंका महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 63 व्या स्थानावर आहे. अन्य एका सामन्यात झेकच्या स्ट्रायकोव्हाने इस्टोनियाच्या कोंटावेटचा 7-6, 3-6, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. स्ट्रायकोव्हा आणि अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेती जपानची ओसाका यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. स्ट्रायकोव्हाला विजयासाठी तब्बल तीन तास झगडावे लागले.