|Monday, December 10, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाप्पांच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी

बाप्पांच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी 

वार्ताहर /कुन्नूर :

घरगुती मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर कुन्नुरात विविध तरुण मंडळांनी साकारलेले देखावे, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई व सुबक मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होत आहे.

कुन्नूर येथील निपाणी रोडवरील राजे ग्रुपची 11 फुटी बसलेली मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. न्यू सम्राट कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची उधळलेल्या खोंडाला वठणीवर आणताना बाप्पा, ही मूर्ती 15 फूट उंच असून त्याच मंडळाने मागील दहा वर्षापासून आणलेल्या विविध मूर्तींचे फोटो प्रदर्शन केले आहे.

शनिवार पेठेतील राजा शिवछत्रपती ग्रुपने हातामध्ये धरलेल्या बासरीवर नृत्य करत असलेले बाप्पा व नृत्यांगणा अशी भव्य मूर्ती स्थापिली आहे. वादळ ग्रुपने शनिवार पेठचा राजा ही सुबक मूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई, कारंजाची निर्मिती केली आहे. संगमेश्वर रोडवरील न्यू गणेश तरुण मंडळाने काल्पनिक महालाची उभारणी करून सुंदर बैठय़ा मूर्तीची स्थापना करून आकर्षक सजावट केली आहे.

जाधव गल्ली बिनधास्त तरुण मंडळ, बसस्थानक परिसरातील विघ्नहर्ता तरुण मंडळ, बागडी गल्लीतील नवरत्न मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ, आझाद तरुण मंडळ, भगवा रक्षक तरुण मंडळ, स्वराज तरुण मंडळ, संगमेश्वर तरुण मंडळ, रणझुंजार तरुण मंडळ, जय जवान जय किसान तरुण मंडळ, ओम गणेश तरुण मंडळ, सटवाई नगरातील कर्तव्य तरुण मंडळ व श्रीराम सेना यांनी आकर्षक मूर्तींची स्थापना केली आहे. ओंकार तरुण मंडळ, भगवा रक्षक तरुण मंडळ, न्यू सम्राट, नवरत्न, न्यू गणेश, रणझुंजार यांच्यासह अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

Related posts: