|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एलआयसीच्या ‘जीवन शांती’ पॉलिसीचा शुभारंभ

एलआयसीच्या ‘जीवन शांती’ पॉलिसीचा शुभारंभ 

प्रतिनिधी /पणजी :

एलआयसीतर्फे ‘जीवन शांती’ या नवीन पॉलिसीचा शुभारंभ करण्यात आला असून त्यातून पॉलिसीधारकांच्या निवृत्तीनंतर शांती मिळावी, अशी तरदूत करण्यात आली आहे. तसेच योग्य तो परवाना आणि शांतीची हमी देण्यात आली आहे.

एलआयसीच्या गोवा विभागाचे वरीष्ठ विभागीय व्यवस्थापक राजेश मिढ्ढा यांनी पाटो- पणजी येथील एलआयसी मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नवीन पॉलिसीची माहिती दिली. हा प्लॅन घेण्याची किंवा खरेदी करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये आयुष्यभर नियमित परतावा मिळण्याची सुविधा देण्यात आली असून 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच सदर पॉलिसी खरेदी करता येते. वैयक्तिक किंवा पती-पत्नी किंवा पूर्ण कुटुंबासाठी देखील ही पॉलिसी उपयुक्त असून दिव्यांग व्यक्तीकरीता ती जास्त लाभदायक करण्यात आली आहे. पॉलिसीधारकांचा दुदैंवाने मृत्यू झाल्यासही त्याचे लाभ वारसांना मिळणार आहेत.

गोव्यात आतापर्यंत या ‘जीवनशांती’ प्लॅनची 50 जणांनी खरेदी केली असून आता शुभारंभ झाल्यानंतर जास्तीत जास्त लोक त्याची खरेदी करतील अशी अशा त्यांनी प्रकट केली. गोव्यात एलआयसीचे 108 विकास अधिकारी कार्यरत असून 300 पेक्षा अधिक एजंट आहेत. सर्व पॉलिसी-प्लॅनना गोव्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून ‘जीवन शांती’ ही नवीन पॉलिसी देखील गोमंतकीय जनेतला पसंत पडण्यासारखी आहे. पत्रकार परिषदेला अभय कुलकर्णी, नकुल बेंद्रे, अरविंद नानीवडेकर, निखिल बम हे इतर विभागांचे व्यवस्थापक उपस्थित होते. गोव्यातील एलआयसीच्या सर्व शाखातून पॉलिसी विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहे.