|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » आयसीआयसीआय-सारस्वतमध्ये बँकाश्युरन्स भागिदारी

आयसीआयसीआय-सारस्वतमध्ये बँकाश्युरन्स भागिदारी 

पुणे/ प्रतिनिधी :

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ व सारस्वत सहकारी बँक यांच्यात विविध आयुर्विमा उत्पादने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने भागिदारी झाली आहे.

या भागीदारीद्वारे, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश व कर्नाटक येथील सारस्वत बँकेच्या अंदाजे 280 शाखा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफची सर्व संरक्षण व बचत उत्पादने उपलब्ध करणार आहेत. सारस्वत सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता सांधणे म्हणाल्या, या सहयोगामुळे ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची तसेच त्यांच्या संरक्षण व बचतीच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी आयुर्विमा उत्पादने देणे शक्मय होणार आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. कन्नन म्हणाले, आमच्या ग्राहककेंद्री उत्पादनांमुळे बँकेच्या ग्राहकांना जीवनातील अनिश्चितता हाताळण्यासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षेची तरतूद करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. काही प्रमुख संरक्षण उत्पादनांमध्ये 34 गंभीर आजारांपासून संरक्षण देणारा पहिलावहिला टर्म प्लान आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट व विविध प्रकारचे हृदयाचे रोग व कॅन्सर यांचा समावेश करणारा हेल्थ इन्शुरन्स प्लान आयसीआयसीआय प्रु हार्ट/ कॅन्सर प्रोटेक्ट यांचा समावेश आहे.