|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कातवड येथे रिक्षाला दुचाकीची धडक

कातवड येथे रिक्षाला दुचाकीची धडक 

वार्ताहर / मालवण:

कातवड साळकुंभा मार्गावरून जाणाऱया रिक्षाला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालक प्रवाशांना घेऊन साळकुंभा येथे जात होता. ही रिक्षा कातवड साळकुंभा वळणावर आली असता दुचाकीने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील हरिश्चंद्र सत्यवान गुराम (23) व सुनिल शशिकांत गुराम (23, दोघेही रा. कट्टा गुरामवाडी) हे रस्त्यावर कोसळले. स्थानिकांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातात रिक्षा व दुचाकीचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. जखमींना कुडाळ येथे नेण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत यांनी मदत केली.

Related posts: