|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू!

अत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू! 

संतोष कोळी यांचे प्रतिपादन : विजयदुर्ग येथे महिला मार्गदर्शन कार्यक्रम

प्रतिनिधी / विजयदुर्ग:

अत्याचार रोखण्यासाठी सदैव आम्ही पाठिशी उभे राहू, असे प्रतिपादन विजयदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांनी येथे केले. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आणि विजयदुर्ग पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस ठाणे येथे आयोजित महिला मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, ‘एक गाव, एक पोलीस’ उपक्रमांतर्गत महिला पोलीस अधिकारी म्हणून गोसावी यांची निवड करण्यात आल्याची माहिती कोळी यांनी दिली.

श्रीमती गोसावी, श्रीमती मिठबावकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नागरिक अविनाश गोखले, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या सचिव संजना आळवे, उपाध्यक्ष सचिन खडपे, विरांगणा ग्रामसंघाच्या सचिव योगिता परुळेकर, गनी मुजावर, चंद्रमोहन मणचेकर आदी उपस्थित होते. कोळी यांनी घडणारे अत्याचार, हल्ले, विनयभंग तसेच बँक एटीएम व वॉटस्ऍप यापासून होणारे चांगले आणि वाईट परिणाम, विविध गुन्हे, कायदा-कलम आदींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या पुस्तकातील विविध मुद्दे उदाहरणासह पटवून दिले. महिलांनी समाजातील ताज्या घटनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. सूत्रसंचालन मंडळाचे उपसचिव शैलेश खडपे यांनी, तर आभार मंडळाच्या सदस्या मृगया बिडये यांनी मानले. विजयदुर्ग परिसरातील बचतगटांतील महिला सदस्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Related posts: