|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राफेलसाठी अंबानी कंपनीची निवड भारताने केली

राफेलसाठी अंबानी कंपनीची निवड भारताने केली 

राफेल प्रकरणी फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलंद यांच्या हवाल्याने वृत्तपत्रात  दावा, भारताकडून इन्कार

वृत्तसंस्था/ पॅरिस

राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड भारत सरकारच्या सांगण्यावरून करण्यात आली असा दावा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलंद यांच्या हवाल्याने एका प्रेंच वृत्तपत्रात करण्यात आला आहे. तथापि हा दावा भारताच्या संरक्षण विभागाकडून फेटाळण्यात आला आहे.

एका मुलाखतीत ओलंद यांनी हा दावा केल्याचे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. तथापि, त्याला संबंधितांनी दुजोरा दिलेला नाही.

राफेल विमानांच्या काही सुटय़ा भागाची निर्मिती भारतात करण्याचे करारानुसार ठरविण्यात आले होते. सुमारे 30000 कोटी रुपये किमतीच्या सुटय़ा भागांची निर्मिती करण्यात येणार होती. सध्या यावर अंबानींच्या कंपनीमध्ये कामही सुरू झाले आहे. अंबानींच्या कंपनीचे नाव राफेल विमानांची निर्मिती करणाऱया डेसॉल्ट कंपनीला भारतानेच सुचविले होते. असे या वृत्तपत्रात म्हटले आहे.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात डेसॉल्ट कंपनीने भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. या कंपनीबाबत चर्चा सुरू होती. तथापि डेसॉल्ट कंपनीने हिंदुस्थान एरोनॉटिकस कंपनी या विमानांची हाताळणी करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले होते. तसेच या कंपनीशी करार करण्यास नकार दिला होता.

नंतर मोदी सरकार केंद्रात स्थानापन्न झाल्यानंतर डेसॉल्ट कंपनीने अंबनीच्या कंपनीशी करार केला. त्यानुसार भारत खरेदी करणार असणाऱया 36 विमानांचे काही सुटे भाग निर्माण करण्याचे कंत्राट अंबानींच्या कंपनीला मिळाले. भारत सरकारने खासगी कंपनींची निवड या कामासाठी करून भ्रष्टाचार केला आहे असा आरोप काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी केलेला आहे. सध्या राफेल प्रकरण भारतात चांगलेच गाजत आहे.

सदर वृत्तपत्राने फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलंद यांच्या कथित वक्तव्याचा आधार घेतला आहे. तथापि डेसॉल्ट कंपनी किंवा ओलंद यांनी स्वतंत्रपणे या लेखातील मजकुराला दुजोरा दिलेला नाही. हा अहवालाच्या स्वरुपातील लेख कोणी लिहिला आहे याबाबत स्पष्टता नाही. भारत सरकारच्या संरक्षण विभागाने लेखातील मजकूर नाकारला आहे.

ओलन यांच्यावरही आरोप

फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलंद यांच्यावर अन्य काही प्रकरणांच्या संबंधात फ्रान्समध्ये भ्रष्ट भांडवलशाहीला प्रोत्साहन दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या एका भागीदाराचीही चौशी करण्यात येत आहे.

Related posts: