|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » नाओमी ओसाका उपांत्य फेरीत

नाओमी ओसाका उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ टोकियो

अलीकडेच अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकणाऱया जपानच्या नाओमी ओसाकाने पॅन पॅसिफिक टेनिस स्पर्धेत बार्बर स्ट्रायकोव्हाला देखील 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. अवघ्या तासाभरातच तिने हा सामना निकाली केला. 20 वर्षीय ओसाकाने प्रारंभापासून आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखताना स्ट्रायकोव्हाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, उपांत्य फेरीत नाओमीसमोर इटलीच्या कॅमिला गिओर्गीचे आव्हान असेल. 

तत्पूर्वी, दिवसभरातील अन्य लढतीत माजी चॅम्पियन व दिग्गज खेळाडू व्हिक्टोरिया अझारेंकाला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. अझारेंकाच्या या माघारीमुळे इटलीच्या कॅमिला  ग्रिओर्गीला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तसेच चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने अमेरिकन पात्रताधारक ऍलिसन रिस्केला 6-1, 6-7, 7-6 असे पराभूत करताना अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत प्लिस्कोव्हाची लढत क्रोएशियाच्या डोना व्हिकशी होईल. क्रोएशियाच्या युवा डोनाने कॅरोलिन गार्कीला 6-3, 6-4 असे नमवण्याची किमया साधली.