|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला नंबर प्लेट नसणाऱया दुचाकीवर कारवाई

गडहिंग्लजला नंबर प्लेट नसणाऱया दुचाकीवर कारवाई 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

गडहिंग्लज पोलीस वाहतूक शाखेकडून शहरात विविध ठिकाणी नंबर प्लेट नसणाऱया दुचाकीवर धडक कारवाई करून दंड वसूल करण्यास सुरवात केली आहे. भडगाव येथील सोन्याच्या दुकानावर बनावट पिस्तुलच्या आधारे घातलेल्या दरोडा प्रकरणी नंबर प्लेट नसणारी दुचाकी वापरल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगतिले आहे. त्या पार्श्वभुमीवर गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी शहरातील दसरा चौकात दुचाकीस्वारांवर कारवाई केली.

गडहिंग्लज शहरात नंबर प्लेट नसणाऱया दुचाकी जास्त फिरत आहेत. त्याचबरोबर उत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने दुचाकी वाहनधारकाची कसून चौकशी व दुचाकीचे कागपत्रे, पॅन्सी नंबर प्लेट, वाहन परवाना तपास करत होते. दिवसभरात 39 वाहनाच्याव दंडात्मक कारवाई केले आहेत. त्याचबरोबर काही गाडी विक्रेत्यांनी आरटीओ रजिस्टर होण्याआदीच वाहन दिल्याचे यावेळी दिसून आले. अशा विक्रेत्यांवरही कारवाईची शिफारस केली आहे.

 

Related posts: