|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तीन कारखान्यांना उत्पादन बंदीचे आदेश

तीन कारखान्यांना उत्पादन बंदीचे आदेश 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर शहरातील मजरेवाडी परिसरात अमित देवसानी टेक्सटाईल, रमेश कोंपली ऍन्ड कोंपली कापड प्रक्रिया उद्योगातील बाहेर पडणाऱया सांडपाण्यावर शास्त्रशुध्द़ पध्दतीने प्रक्रिया न करता ते पाणी होटगी तलावात गटारीद्वारे सोडण्यात आल्याने या तीन कापड प्रक्रिया उद्योगावर उत्पादन बंदीची कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

  मजरेवाडी परिसरात हे तीन उद्योग कापड प्रक्रिया अर्थात टेक्सटाईल क्षेत्रात कार्यरत असून यामधून बाहेर पडणाऱया दूषित पाण्यावर शास्त्रशुध्द प्रक्रिया करुन पुन्हा ते पाणी उद्योगाला वापरणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी बाहेर पडणारे पाणी महापालिकेच्या गटारीत सोडून दिले. त्यामुळे होटगी तलावात हे पाणी मिसळल्याने जलप्रदूषण होत असल्याची तक्रार होटगी तलाव बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रदूषण महामंडळाकडे करण्यात आली होती. त्यानुसार प्रदूषण महामंडळाने आलेल्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली. तसेच वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर या उद्योगाला उत्पादनबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्र जलप्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा 1974 नुसार या उद्योगाची वीज आणि पाणी बंद करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.