|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ‘शिवयोद्धा’ संघटेनेची स्थापना

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ‘शिवयोद्धा’ संघटेनेची स्थापना 

अध्यक्ष शिवप्रसाद जोशी यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

 समाजातील विविध विषय हाताळण्यासाठी तसेच मातृभुमिच्या रक्षणासाठी राज्यात ‘शिवयोद्धा’ संघटनेची स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व तालुक्यामध्ये या संघटनेचा समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे काल या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवप्रसाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 राज्यात सध्या विविध विषय आहे. समाजात घडणाऱया वाईट गोष्टीवर आळा घालण्यासाठी तसेच जुगार, वेश्याव्यवसाय तसेच भ्रष्टाचार अशा विविध गोष्टीवर आवाज उठवणार आहे. तसेच राज्यातील संस्कृती भाषा यांचे जतन करण्यासाठी  ही संघटना कार्य करणार आहे. राज्यातील ताळागाळातील विषय या संघटनेमार्फत सोडविला जाणार आहे. आतापर्यंत राज्यातील आठ तालुक्यामध्ये कार्य सुरु करण्यात आले आहे. येणाऱया कळात संपूर्ण गोव्यात यांचे कार्य सुरु होणार आहे. सुमारे 80 सदस्य या संघटनेमध्ये जोडले गेले आहेत. असे यावेळी शिवप्रसाद जोशी यांनी सांगितले.

 येणाऱया काळात लोकांनी संधी दिली तर ही संघटना राजकारणात उतरणार आहे. पण सध्या तरी राजकारणात उतरण्याचा हेतू नसून फक्त समाजकार्यासाठी आम्ही संघटना तयार केली आहे. त्यामुळे यात राजकीय काहीच येत नाही फक्त अन्यायाविरोधात आम्ही आवाज उठवणार आहे. शिवरायांचे भक्त असल्याने आम्ही अन्यायाविरोधात काम करणार आहे, असेही यावेळी शिवप्रसाद जोशी यांनी सांगितले.

 या संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून विनय तळेकर, उपाअध्यक्ष आनंद मादेंकर, सचिव माधव विर्डीकर, खजिनदार परी पंडित, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष निलेश वारखंडकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सतीश नाईक, प्रवक्ता मच्छिंद्र च्यारी, महिला अध्यक्षा स्मितल होबळे, उत्तर गोवा महिला अध्यक्षा स्नेहा गोवेकर, दक्षिण गोवा महिला अध्यक्षा उषा दयेकर व संघटक म्हणून किशोर राव यांची निवड करण्यात आली आहे. 

Related posts: