|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू 28 रोजी गोवा दौऱयावर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू 28 रोजी गोवा दौऱयावर 

प्रतिनिधी / पणजी

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे शुक्रवारी 28 सप्टेंबर रोजी गोवा दौऱयावर येणार असून ते एनआयटीच्या (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) पदवीदान सोहळय़ास प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार आहेत.

पणजी येथील कला अकादमीत सकाळी 10 वा. एनआयटीचा हा चौथा पदवीदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल मृदूला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. पर्रीकर हे आजारी व इस्पितळात उपचार घेत असल्याने ते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related posts: