मारुती गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे गणहोम-महाप्रसाद

प्रतिनिधी/ बेळगाव
मारुती गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गेल्या 35 वर्षांपासून अखंडीतपणे श्री गणहोम व महापूजा होत आहे. यंदा 36 वे वर्ष असून या निमित्ताने शुक्रवारी मारुती मंदिरात सकाळी सत्यनारायण पूजा व दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला.
यावेळी स्नेहा पुजारी हिने गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीवर आधारीत कविता सादर केली. याप्रसंगी अध्यक्ष रमेश कालकुंद्री, उपाध्यक्ष नारायण गरूड, अमृत बिर्जे, नागेश सरप, सुरेश धामणेकर, दीपक मोरे, अतुल कडेमणी, पवन नाडगौडा, ओंकार पुजारी, विराज पुजारी, रोहित मोरे, कृष्णकांत पुजारी, पवन पुजारी, अमोल पुजारी, कपिंद्र पुजारी, सुहास पुजारी, अर्जुन पुजारी, दीपक तरळे, विनोद मोरे आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
Related posts:
Posted in: बेळगांव