|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोहरमचे आचरण गांभीर्याने

मोहरमचे आचरण गांभीर्याने 

बेळगाव / प्रतिनिधी

शहर आणि परिसरात मुस्लिम धर्मबांधवांनी शुक्रवारी मोहरमचे गांभीर्याने आचरण केले. यानिमित्त शहरातून ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये धर्मबांधव सहभागी झाले होते.

मोहरम हा गांभीर्याने पाळण्याचा महिना आहे. या महिन्यात पंजे स्थापन करून धार्मिक विधी करण्याची परंपरा जपली जाते. यंदा 34 वर्षानंतर मोहरम आणि गणेशोत्सव एकत्रित आले आहे. शहरात काही ठिकाणी एकत्रित मोहरमचे ताबूत आणि श्रींच्या मंटपांची उभारणी करण्यात आली आहे. धर्मबांधवांनी परस्पर सामंजस्याच्या भावनेतून या उपक्रमात भाग घेतला होता.

शहराच्या भागातील मार्गांवरून ताबूतांची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीनंतर रात्री किल्ला तलावानजिक ताबूतांचे विसर्जन केले.

Related posts: