|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सलग दुसऱ्या वषी अमेरिकन सरकारने दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारताला तिसरं स्थान दिलं आहे. याबद्दलची आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

दहशतवादाचा फटका बसणाऱया देशांची यादी दरवषी अमेरिकेकडून तयार करण्यात येते. यावषी या यादीत इराक पहिल्या, तर अफगाणिस्तान दुसऱया क्रमांरावर आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इसिस, तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहे.

 

2015 मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांचादेखील समावेश आहे. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली. तर या हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पावलेल्यांचे प्रमाण तब्बल 89 टक्क्यांनी वाढलं, अशी आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. 2017 मध्ये भारतात एकूण 860 दहशतवादी हल्ले झाले. यातील 25 टक्के हल्ले एकटय़ा जम्मू-काश्मीरमध्ये झाले, अशी आकडेवारी अमेरिकेन सरकारच्या अहवालात आहे.